Raja Majha歌词由Sonali Bhoir演唱,出自专辑《Raja Majha》,下面是《Raja Majha》完整版歌词!
Raja Majha歌词完整版
इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षर झळकले...
छत्रपती हे दैवत आमुचे, स्वराज्य तोरण बांधियेले
तलवारीच्या धारेवरती, स्वराज्य हिंदवी स्थापियेले.
जय भवानी... जय शिवाजी...
शहापूरच्या माहुली गडाला, छत्रपतींचा स्पर्श तो झाला
वंदन करुनी आजोबाला, वाल्मिकिच्या त्या स्थानाला
डोळखांब गावी होई जल्लोश, भगवा लहरे घराघरावर...।।१।।
छत्रपतींचे नाव कोरले, महाराष्ट्राच्या मातीवर.
डोलखांब गावी उत्सव रंगतो, मावळ्यांच्या त्या जोरावर...
जय भवानी... जय शिवाजी...
हाती समशेर लखलखती, हर हर महादेव गर्जती.
मावले ते रणांगणी, मुघलांस परास्त करती..
राजा माझा ढाण्या वाघ, बसे छत्रुच्या छाताडावर ।।२।।
छत्रपतींचे नाव कोरले महाराष्ट्राच्या मातीवर.
डोलखांब गावी उत्सव रंगतो, मावळ्यांच्या त्या जोरावर...
जय भवानी... जय शिवाजी...
रयतेचा तो वाली ठरला, स्त्री रक्षणार्थ तो धावला
मातेचे ते पांग फेडले, स्वराज्य हिंदवी स्थापियले
शाहिराने लिहिले पोवाडे, अमृत बरसे त्या शब्दांवर ।।३।।
छत्रपतींचे नाव कोरले महाराष्ट्राच्या मातीवर
डोलखांब गावी उत्सव रंगतो, मावळ्यांच्या त्या जोरावर...
जय भवानी... जय शिवाजी...