Kshanat Virale Hasu歌词由Abhishek Nalawade演唱,出自专辑《Kshanat Virale Hasu》,下面是《Kshanat Virale Hasu》完整版歌词!
Kshanat Virale Hasu歌词完整版
क्षणात विरले हसू
ये ना पुन्हा वळणावरी , शोधू जुन्या खुणा
त्या ओळखीच्या वाटा मला , भासती सुन्या सुन्या .
दे ना सुखाचा दिलासा ,
व्याकुळ माझ्या मना !
क्षणात विरले हसू , पापण्या ओलावल्या .
तुला न कळल्या कधी भावना माझ्यातल्या .
अंतरा :
तू नसताना छळतो मला , दरवळ जुन्या क्षणांचा .
किती सोडवावा तरीही सुटेना ,अता हात त्या आठवांचा.
कधी साद ओल्या सुरांची
सांगुन जाते तुला ...
क्षणात विरले हसू , पापण्या ओलावल्या
तुला न कळल्या कधी भावना माझ्यातल्या .