Morya Re歌词由Pritesh Mavale演唱,出自专辑《Morya Re》,下面是《Morya Re》完整版歌词!
Morya Re歌词完整版
मोठ्या थाटात मिरवत आलाय तू
बाप्पा बनूनिया आमचा वाली,
चौका-चौकात जल्लोष नादावला
तुझी दिवानी दुनिया सारी,
तुझ्या भक्तीत तल्लीन सारे...
गुण गाई तुझे चंद्र तारे... (२)
दंगुनिया आज मनामध्ये देवा फितूर चढला तुझा...
मोरया रे बाप्पा मोरया नमन तुला गणराया... (२)
दुःख हरे, आनंद विराजे
बाप्पा तुझ्याच चरणी,
सृष्टीचा... एक तू विधाता
आलो तुझ्याच शरणी...
मलयाचा शोभे मस्तकी टिळा,
लखलखती नयने तुझी...
विघ्नहरा ऐके भक्तांच्या व्यथा,
गजकर्णी श्रवणे तुझी...
बाप्पा आला मुशकसवारे...
लाडू, मोदक चरणी ठेवा रे... (२)
जास्वंदीच्या पुष्प हारांनी रे देवा मखर सजला तुझा...
मोरया रे बाप्पा मोरया नमन तुला गणराया... (२)