Je Tujhyach Saathi歌词由Yogesh Rairikar&Susmirata Dawalkar演唱,出自专辑《Je Tujhyach Saathi》,下面是《Je Tujhyach Saathi》完整版歌词!
Je Tujhyach Saathi歌词完整版
जे तुझ्याचसाठी होते
जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फूल ठेवुनी गेले
रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला
जयघोष तुझा मग सर्व जगाने केला
मी दूर एकटी, माझे डोळे ओले
त्या फुलासारखी अबोल माझी प्रीत
ती अबोल पूजा या माझ्या हृदयात
नच ओठांवरती नाव तुझे कधी आले
तुज कसे कळावे? देवा नाही कळले!
मी दूर अलक्षित तुजसाठी तळमळले
त्या फुलात माझे हृदय ठेवुनी गेले