笨鸟先飞
我们一直在努力
2025-01-25 20:57 | 星期六

Baap Pandurang歌词-Niru&Rocksun&sanja&Vaibhya

Baap Pandurang歌词由Niru&Rocksun&sanja&Vaibhya演唱,出自专辑《Baap Pandurang》,下面是《Baap Pandurang》完整版歌词!

Baap Pandurang歌词

Baap Pandurang歌词完整版

बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा

सावळे रूप उभे विटेवरी

नामाचा गजर वैष्णवांचा सागर

जमले सारे संत आज पंढरपुरी x2

शब्दांत नामात उरात विठ्ठल

ध्यानात मनात प्रेमात विठ्ठल

गाण्यात अन टाळ घोषात विठ्ठल

सुखाचा डोंगर माझा तो विठ्ठल

माऊली म्हणतो आम्ही असा तो विठ्ठल

आईच्या मुखातून बोलतो विठ्ठल

जगाचा पोशिंदा रखुमाईचा विठ्ठल

मातीत पाऊस नाचतो विठ्ठल

काटेरी वाटेत मुलायम चिखल

संतांच्या भेटीला आतुर विठ्ठल

चंद्रभागे वाळवंटी विटेवरी अठ्ठावीस

युगे वाट भक्तांची पाहतोय विठ्ठल

पंढरीच्या रिंगणात पांढऱ्या ढगांचा मेळ

काळा सावळा विठू माझा त्याचा सारा खेळ

बोटांचा ब्रश केला रक्ताने लाल

मृदुंगाची शाई काळ्याची झाली लाल

आंधळा म्या वारकरी खणखणती टाळ

वाळवंटाच्या अंगणात भक्तीची नाळ

जातीपाती तोडती ही तुळशीची माळ

मृदुंग टाळ बघ फुगडीचा खेळ,

सरतो दुःखाचा काळ होतो सुखाचा मेळ

रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी

कासव हाय म्या राया तुझ्या दारी

देहभान विसरून आलो तुझ्या दारी

वारी वारी वारी जन्म मरणाची वारी

बाप आमचा विठू आम्ही लेकरं त्याची सारी

बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा

सावळे रूप उभे विटेवरी

नामाचा गजर वैष्णवांचा सागर

जमले सारे संत आज पंढरपुरी

वारी वारी जन्म मरणाची वारी

माय चंद्रभागा बाप सावळा हरी

सारे दोष दुखः क्रोध पाप धुवूनी जातं

विठ्ठल विठ्ठल भक्तीच्या नामात

कपाळी टिळा हातात टाळ गळ्यात माळ

अनवाणी पाय मनात भाव मुखी विठूचं नाव

पंढरी गांव त्याचं वारकरी नाव

सावळे रूप हे सावळा रंग

सावळ्या रंगात सगळेच दंग

सावळ्या राजाची पडते सावली

पावली पावली भक्तांना माऊली

पाऊले पाऊले पंढरीची वाट

गजर विठूचा माझ्या मनात

तल्लीन संत भक्तीच्या रानात

कर कटेवरी उभा विटेवरी

चंद्रभागे तीरी

विठू थाटात विठू थाटात

माझा विठू थाटात

माझ्या येड्या गळ्यात बघ म्या टाळ घातलाय

विठ्ठला तुझ्या नामात म्या जीव ओतलाय

पापण्या मिटल्यावर जणू मला खूप दिसतंय

माझ्या डोळ्यात बघ तुझंच रूप दिसतंय

तुझ्या नामाचा घोष माझ्या मनाचा ठाव नाय

मला ठाव हाय तुला समद ठाव हाय

मी वारकरी तुझा उभ्या गगनात बी माविन

येडं काळीज हे माझं तुझ्या चरणात बी ठेवीन

तुझ्या एकी देवा मला कोण हाय सांग

विठ्ठल नामाच्या धाग्यात मी देह माझा ओवीन

तुका नामाचा अभंग खमक्या काळजावर वार करी

म्या भोळा भक्त तुझा तुझा साधा वारकरी

तुझ्यासाठी झुरून देवा वाळवंटी न्हालो

वादळाला चिरून बघ मी तुझ्या चरणी आलो

विरलं देहभान त्राण प्राण उठलं रान

केला मानपान धर्म दान मुखी तुझं गाणं

विठ्ठल नामाचा घोष उभ्या नभी दुमदुमला

वाट थकून गेली वारकरी नाही दमला

तळपाय पडले घटे सुर गळ्यापासून फाटे

डोळ्यांना देवा फक्त तुझ्या दर्शनाची आसं

काळाचा टाहो फुटे दीर्घ संयम ना तुटे

विठ्ठल हाची ध्यास आणि विठ्ठल हाची श्वास

बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा

सावळे रूप उभे विटेवरी

नामाचा गजर वैष्णवांचा सागर

जमले सारे संत आज पंढरपुरी

未经允许不得转载 » 本文链接:http://www.benxiaoben.com/efe92VVA9Bg5SVAAF.html

相关推荐

  • Stayx(turreo edit)(feat. Seba Bootleg)歌词-Fel Remix&Seba Bootleg

    Stayx(turreo edit)(feat. Seba Bootleg)歌词-Fel Remix&Seba Bootleg

    Stayx(turreo edit)(feat. Seba Bootleg)歌词由Fel Remix&Seba Bootleg演唱,出自专辑《Stayx (turreo edit) (feat. Seba Bootleg)》,下面是《Stayx(turreo edi...

  • Беги歌词-Nechaev

    Беги歌词-Nechaev

    歌词由Nechaev演唱,出自专辑《 (Original + Remix)》,下面是《》完整版歌词! 歌词完整版 - NechaevLyrics by: Composed by: -- -- ...

  • 讲个笑话 (伴奏)歌词-钟棋煜 (渡)

    讲个笑话 (伴奏)歌词-钟棋煜 (渡)

    讲个笑话 (伴奏)歌词由钟棋煜 (渡)演唱,出自专辑《讲个笑话》,下面是《讲个笑话 (伴奏)》完整版歌词! 讲个笑话 (伴奏)歌词完整版 讲个笑话 - 钟棋煜 (渡)词:...

  • 少年担当歌词-钟雨绮&高钦权

    少年担当歌词-钟雨绮&高钦权

    少年担当歌词由钟雨绮&高钦权演唱,出自专辑《少年担当》,下面是《少年担当》完整版歌词! 少年担当歌词完整版 少年担当 - 钟雨绮/高钦权词:罗章志/魏英曲:谭...